अजून किती दिवस लागणार

अजून किती दिवस लागणार

संघटन मजबूत करायला
अजून किती दिवास लागणार
झोपेतून उठा आता
नूस्त झोपुनच नाही चालणार

बाते आपली बडी बडी
मात्र काम आपलं शून्य आहे
आपसातल्या त्या मतभेद विसरून
एकी करणं सुज्ञ आहे

मीच का करू,अन मीच का करावं
हाच आज चा किस्सा आहे
घराला ते घर बनवून ठेवणं
प्रत्येक विंट चा हिस्सा आहे

मिशन हे चार डोक्यांचं नसून
तुमचं आमचं फर्ज आहे
शिरसाठ तुझावर हि विसरू नको
बाबा साहेबांच कर्ज आहे..

Pankaj shirsath
Previous
Next Post »